कोंढवी-किल्ला

  • किल्लाचे नाव :
  • कोंढवी
  • अडचण पातळी:
  • मध्यम
  • सहनशक्ती पातळी:
  • मध्यम

किल्ला-बद्दल माहिती

  • किल्ल्याचा प्रकार:
  • गिरीदुर्ग
  • किल्ल्याची ऊंची:
  • 900
  • गाव:
  • कोंढवी
  • जिल्हा:
  • रायगड
  • पोहोचण्याच्या वाटा:
  • मुंबई - पुण्याहून कोंढवी गडावर जाण्यासाठी प्रथम मुंबई - गोवा मार्गावरील पोलादपूर हे गाव गाठवे. पोलादपूरहून कोंढवी / आदेशपूर फाटा ७ किमी अंतरावर आहे. फाट्यापासून कोंढवी गाव ३ किमी अंतरावर आहे. पोलादपूरहून खाजगी वाहानाने किंवा सहा आसनी रिक्षाने कोंढवी गावात जाता येते. कोंढवी गाव गडाच्या पाऊण उंचीवर असल्यामुळे येथून गडावर जाण्यास अर्धा तास पुरतो.
  • वर्णन:
  • पोलदपूरहून खेड - चिपळूणकडे जातांना कशेडी हा प्राचिन घाटमार्ग लागतो. या घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी कोंढवी किल्ल्याची उआर्णी करण्यात आली होती. पोलादपूर जवळील कोंढवी गाव उर्फ तळ्याची वाडी येथे कोंढवी किल्ला आहे. गावात शिरल्यावर उजव्या बाजूने किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. यामार्गाने १० मिनिटे चालत गेल्यावर आपण जिर्णोध्दारीत भैरव मंदिरापासी पोहोचतो. मंदिराच्या गाभर्‍यात ४ दगडी मुर्ती व एक अप्रतिम शिवलींग आहे. मंदिर डाव्या बाजूला ठेऊन सरळ चालत गेल्यावर पायवाटेला दोन फाटे फुटतात. त्यातील डाव्या बाजूची पायवाट पकडून १५ मिनीटांचा चढ चढून गेल्यावर आपण गडमाथ्यावर पोहोचतो. गडमाथ्यावर सुध्दा भैरवनाथाचे प्राचीन मंदिर असून याला "आठगाव भैरवनाथ " या नावाने ओळखले जाते. या मंदिराची महती अशी सांगतात की, या डोंगराच्या आजूबाजूच्या परीसरातील कोंढवी, तळ्याची वाडी,फणसकोंड,गांजण, खडपी, धामणदेवी कातली, खडकवणे व गोलदरा असी आठ गावे वसलेली असून या आठ गावातले गावकरी भैरवनाथाला आपले श्रध्दास्थान मानतात. त्यामुळे हे मंदिर "आठगाव भैरवनाथ " या नावाने ओळखले जाते.