भांगसीगड -किल्ला

 भांगसीगड -किल्ला
 भांगसीगड -किल्ला
 • किल्लाचे नाव :
 • भांगसी गड / भांगसाई गड
 • अडचण पातळी:
 • सोपी
 • सहनशक्ती पातळी:
 • सोपी

किल्ला-बद्दल माहिती

 • किल्ल्याची ऊंची:
 • २७०० फुट
 • किल्ल्याचा प्रकार:
 • गिरीदुर्ग
 • जिल्हा:
 • औरंगाबाद
 • पोहोचण्याच्या वाटा::
 • १) भांगसी गडाच्या पायथ्यापर्यंत खाजगी वहानाने जाता येते. औरंगाबाद – वेरूळ रस्त्यावर औरंगाबाद शहरापासून शरणपूर गाव साधारण १० किमीवर आहे. येथून डाव्या बाजूचा रस्ता औरंगाबाद – देवगिरी रेल्वे लाईन ओलांडून पलिकडे एम आय डी सी कडे जातो. या रस्त्यावर भांगसी गडाचा एकमेव डोंगर आहे, तसे़च गडाची दिशा दाखवणारे फलक लावलेले आहेत. या रस्त्यावर डावीकडे जाणारा रस्ता भांगसी गडाच्या पायथ्या पर्यंत जातो. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी १५ मिनीटे ते ३० मिनीटे लागतात.
  २) औरंगाबादहून वेरूळ, मनमाड, चाळीसगावकडे जाणार्या एसटीने शरणपूर फाट्याला उतरावे. तेथून चालत पाऊण तासात किल्ल्यावर जाता येते. राहाण्याची सोय: गडावर रहाण्याची सोय नाही. जेवणाची सोय: जेवणाची सोय गड पायथ्याच्या हॉटेलात होऊ शकते. पाण्याची सोय: गडावर पिण्यायोग्य नाही. जाण्यासाठी लागणारा वेळ: पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी २० मिनीटे लागतात.
 • वर्णन:
 • औरंगाबाद – देवगिरी रस्त्यावर, औरंगाबाद शहरापासून १६ किमी अंतरावर अजिंठा डोंगर रांगेपासून वेगळा झालेला एक छोटा डोंगर आहे. आजूबाजूच्या सपाट परीसरामुळे हा डोंगर उठून दिसतो. या डोंगरावर कातळात कोरलेला सुंदर किल्ला आहे, तोच भांगसी गड. या किल्ल्यावरील कातळात कोरून काढलेल्या भूयारात असलेल्या भांगसाई देवी मंदिरामुळे औरंगाबाद परिसरातील लोक या गडाला “भांगसाई गड” या नावाने ओळखतात. भांगसी गड चढतांना गडमाथ्याच्या थोडं खाली उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक गुहा आहे. गुहेच्या पुढे सिमेंटच्या पायर्या संपून कातळात खोदलेल्या पूरातन पायर्या लागतात.या गुहेचे तोंड दक्षिणेला आहे. ही गुहा दोन स्तरात खोदलेली आहे. भांगसाई देवी मंदिरा पासून गुहेच्या तोंडापर्यंत डाव्या बाजूला गुहेची उंची जेमतेम १ ते ३ फूट आहे, तर उजव्या बाजूस पाण्याचे विशाल टाक खोदलेले आहे. या रचनेमुळे उन्हाळ्याच्या दिवसात गडावरील शिबंदीला पाणी आणि थंडावा एकाच ठिकाणी उपलब्ध होत असे. या गुहेच्या उजव्या कोपर्यात गणपतीची मुर्ती, शिवलिंग व नंदी ठेवलेले आहेत.