लहुगड-किल्ला

 लहुगड-किल्ला
 लहुगड-किल्ला
लहुगड-किल्ला
  • किल्लाचे नाव :
  • लहुगड
  • अडचण पातळी:
  • सोपी
  • सहनशक्ती पातळी:
  • सोपी

किल्ला-बद्दल माहिती

  • किल्ल्याची ऊंची:
  • २७०० फुट
  • किल्ल्याचा प्रकार:
  • गिरीदुर्ग
  • जिल्हा:
  • औरंगाबाद
  • वर्णन:
  • औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा, वेरूळ ही दगडात कोरलेली अजोड लेणी आहेत. त्याचप्रमाणे दगड तासून / कोरून बेलाग बनवलेला देवगिरी किल्लाही सर्वांच्या परीचयाचा आहे. यांच्याच पंक्तीत बसणारा लहुगड हा दगडात कोरलेला एक छोटेखानी किल्ला औरंगाबाद शहरापासून साधारण ४० किमीवर आहे. या किल्ल्यावर दगडात कोरलेले गुहा मंदिर, कातळात कोरलेली वेगवेगळ्या प्रकारची १८ पाण्याची पाण्याची टाकी, दगडात कोरलेले प्रवेशव्दार, पायर्या, गुहा असे कोरीवकामाचे वैविध्य पहायला मिळते.औरंगाबाद – अजिंठा व औरंगाबाद – जालना या पुरातन मार्गाच्या मधून अजिंठा डोंगररांग या मार्गांना समांतर धावते. या दोन मार्गांना जोडणार्या खिंडीवर लक्ष ठेवण्यासाठी लहूगडाची निर्मिती करण्यात आली होती.
  • इतिहास:
  • लहुगडचा इतिहास उपलब्ध नाही. देवगिरी या राजधानाच्या गडाशी जवळीक व गडावर कातळात खोदलेली टाकी व गुहा पहाता हा गड ७व्या किंवा ८व्या शतकातला असावा.